साक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल, साक्री येथे सोमवार दि.०७ रोजी दसरा सण साजरा झाला. यावेळी वाईट विचारांच्या रावणाचे दहन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, प्राचार्य अतुल देव व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांनी विद्यार्थ्यांना दसरा (विजयादशमी)चे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी, दुर्गादेवी व महिषासुर यामधील झालेल्या युद्धाचे दृश्य दाखविण्यात आले. तसेच, देवींचे नऊ रुपे विद्यार्थ्यांनी साकारली. यात मनस्वी ठाकरे – अंबेमाता, गौरवी सोनवणे – वैष्णोदेवी, योगेश्वरी अहिरे – सप्तश्रृंगी देवी, आराध्या भामरे – संतोषी माता, तनिष्का सोनवणे – महाकाली, सौम्या ठाकरे – सरस्वती देवी, अन्वी जैन – महालक्ष्मी, कावेरी जाधव – दुर्गा माता, युक्ता देसले – पार्वती देवी, प्रणव ठाकरे – महिषासुर, शौर्य देसले – सिंह यांनी भुमिका सादर केल्या. प्रसंगी, वनवासातून अयोध्येत परततांना राम, लक्ष्मण, सीता यांचेही दृश्य दाखविण्यात आले. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी दसरा सणाचे महत्त्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी रास दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर रामाच्या हस्ते रावणदहन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. तसेच फलक लेखन देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले.