






पिंपळनेर – येथील प्रचिती पब्लिक स्कूलमध्ये सोमवार दि. ७ ऑक्टोबर दसरा (विजयादशमी)निमीत्त दांडिया उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रावण दहन करून चांगले विचार आत्मसात करण्याची शपथ विद्यार्थ्यांनी घेतली. तत्पूर्वी, सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी, विद्यार्थ्यांनी राम – सिता, लक्ष्मण आणि हनुमानाची वेशभुषा साकारून सर्वांचे लक्ष वेधले. गीत विसपुते –राम, कृष्णा सोनवणे- लक्ष्मण, काव्या कोठावदे – सिता, तेजस खैरनार – हनुमान यांनी भुमिका साकारल्या. त्यानंतर, इ. ४ थीच्या लावण्या मुसळे हिने दसरा सणाविषयीची माहिती सांगितली. प्राचार्या वैशाली लाडे, कमल पवार यांनी दसरा सणाचे महत्त्व पटवून दिले. समन्वयक राहुल पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना माहिती दिली. स्कूलचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी झालेल्या दांडिया नृत्याचा विद्यार्थ्यांनी भरपुर आनंद घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आश्विनी मोरे यांनी केले. कार्यक्रमासाठी ज्योती खैरनार, पल्लवी मोरे यांनी फलक लेखन व रांगोळी रेखाटन केले. पूजा नेरकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्कूलच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.