काळभोरनगर भागात बनसोडे यांची पदयात्रा

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांना मोठया मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी येथे केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ काळभोरनगर आकुर्डी भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी काळभोर बोलत होत्या. या पदयात्रेत आघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे, पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती जगदीश शेट्टी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, तसेच मुकुंद काळभोर, जक्कल काळभोर, आझम खान, मनीषा काळभोर, चिंटू दातीर-पाटील, सविता धुमाळ, किरण देशमुख, दीपाली देशमुख आदी सहभागी झाले होते.

यावेळी वैशाली  काळभोर म्हणाल्या की, राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी आमदार असताना व निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही सातत्याने लोकांची कामे केली. पिंपरी मतदारसंघाचा विकास करण्यासाठी बनसोडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन काळभोर यांनी केले.

अण्णा बनसोडे यांनी या पदयात्रेच्यानिमित्ताने ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या व मतदारांच्या भेटी-गाठी घेतल्या. यावेळी महिला भगिनींनी बनसोडे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here