पिंपरी:- चिंचवडेनगर येथील सद्गुरू श्री अनिरूध्द उपासना केंद्रात नुकतेच रक्तदान शिबीर संपन्न झाले. रविवारी दि.२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर घेण्यात आले.
या रक्तदान शिबीरात एकूण ६८ रक्तदात्यांनी सहभाग घेतला. तर ५४ जणांनी रक्तदान केले. या संस्थेच्या वतीने संदीप वाघ, विकास सुतार, प्रकाश कुलकर्णी, मारुती पालेकर व इतर २४ कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबीरासाठी वाय.सी.एम रक्तपेढीस आमंत्रित करण्यात आले होते. तसेच या शिबीरास माजी नगरसेविका आशाताई सुर्यवंशी व सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे यांनी भेट दिली.