महापालिका सहशहर अभियंता प्रविण तुपे यांची माहिती

पिंपरी | चिंचवडच्या सायन्स पार्क परिसरात उभारण्यात येणाऱ्या तारांगण प्रकल्पाचे स्थापत्यविषयक काम जवळपास पूर्ण झाले आहे. इतर यंत्रणा बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे 75 टक्के काम तारांगण प्रकल्पाचे झाले असून येत्या दोन महिन्यात ते पुर्णत्वास येईल, अशी माहिती महापालिका सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी दिली आहे.

चिंचवडच्या सायन्स पार्क परिसरात उभारण्यात येणाऱ्या तारांगणासाठी १५ कोटी खर्च होणार आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असणाऱ्या तारांगणात १५० बैठक व्यवस्था आहे. येथे १०० बैठक व्यवस्थेचे स्वतंत्र सभागृह आहे. याशिवाय, पुस्तक दालनाचेही नियोजन आहे. हे तारांगण १५.० मीटर व्यासाचे व गोलाकार असून त्याचा सांगाडा लोखंडी आहे. त्यावर आधुनिक काचेचे आवरण बसवण्यात येणार आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या समितीने केलेल्या सूचनांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे 15 कोटींची स्थापत्यविषय कामे सुरू होती. ती जवळपास पूर्ण झालेली आहेत. आता सुमारे विद्यूत व इतर आवश्यक यंत्रणा, उपकरणे बसविण्याची सुमारे 10 कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. ही काम तातडीने करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकूण प्रकल्पाचे 75 टक्के काम झाले असून उर्वरित काम दोन महिन्यात पूर्ण होईल. सायन्स पार्कजवळ हा प्रकल्प होत असल्याने पर्यटक, विद्यार्थी आणि विज्ञान-अंतराळ अभ्यासकांसाठी शहरात ही पर्वणी मिळणार आहे, असेही प्रवीण तुपे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here