प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी संवाद साधणे आवश्यक : डॉ. रजनी इंदुलकर

विविध उद्योग समूहामधील 26 संघातून 80 स्पर्धकांनी नोंदविला सहभाग

चिंचवड  भोसरी येथील क्वॉलिटी सर्कल एक्सलन्स सर्कलमध्ये क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या वतीने सातव्या क्वॉलिटी मंथ सेलिब्रेशननिमित्त क्वॉलिटी इंप्रुमेंट सक्सेस स्टोरी प्रेझेंन्टेशन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी डॉ. इंदुलकर बोलत होत्या. स्पर्धेचे उद्घाटन क्वॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

यास्पर्धेत विविध उद्योग समूहामधील 26 संघातून 80 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्या गुणवत्ता सुधार संदर्भात प्रबंध सादरीकरण, भित्तीपत्रक, श्लोगण, प्रश्नमंजूषा या स्पर्धांचा समावेश होता. त्यात अभिजीत टेक्नो, के.एस.पी.जी. ऑटोमेटिव्ह, मिंडा कार्पोरेशन, मिंडा रेंडर, प्रिकॉल लिमिटेड, सॅन्डविक एशिया, स्पायसर इंडिया, टाटा मोटर्स (ईआरसी), टाटा ऑटोकॉम्प मधील विजेत्यांना 13 सुवर्ण, 6 रजत व दोन कांस्यपदक पटकाविले. विजेत्यांना मिंडा रेंडर उद्योग समूहाचे विभागप्रमुख भूपेश मॉल यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी स्वासपीठावरती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी टाटा ऑटोकॉम्पचे एल अ‍ॅण्ड डी डेव्हलपमेंट विभागाचे प्रमुख सज्जीकुमार, एम.व्ही. एम.एल. चे व्यवस्थापक पवनकुमार रौंदळ, क्वॉलिटी सर्कलचे एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलर अनंत क्षीरसागर, फोरमच्या विजया रुमाले उपस्थित होते.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. इंदुलकर म्हणाल्या कोणत्या उद्योग समूहाचे प्रवर्तक त्यातील व्यवस्थापन व इतर काम करणारे घटक सामुहिकपणे त्यांच्या उत्पादित वस्तूंची गुणवत्ता, टिकावूपणा आदींचा विचार करून ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जर उद्योग समूहातील विविध विभागात काम करणार्‍यामध्ये एकमेकांत संवाद नसेल, परस्परांत समन्वय नसेल, कर्तव्यात कसूर झाली तर त्याचा परिणाम वस्तू निर्मिती व उद्योग समूहावर होतो हे प्रत्येकाने कटाक्षाने टाळले पाहिजे. नियोजित ध्येयपूर्तीसाठी व्यवस्थापन व कामगार यांच्याकडून एकमेकांच्या भावना दुखावणार असे वर्तन उद्योग समूहात असले पाहिजे. एखादा चुकलास तर त्याचा सर्वांसमोर पानउतारा होता कामा नये, झालेल्या चुकावर पांघरुण घालून योग्य ते मार्गदर्शन केले तर, ती व्यक्ति कायमचीच आदर करेल, यासाठी परस्परांत संवाद, स्नेहभाव, सामंजस्य व प्रत्येकाने आपण करीत असलेल्या कामावर प्रेम केले तर, उद्योगसमूहाचा प्रगतीचा आलेख देखील उंचावेल हे सर्व करीत असताना कोणाचे शोषण होणार नाही, याबाबत दक्ष देखील राहिले पाहिजे.

पारितोषिक वितरण समारंभाच्याप्रसंगी मिन्डा रेंडर उद्योग समूह विभागप्रमुख भूपेश मॉल म्हणाले, उपस्थित स्पर्धकांनी आपण ज्या उद्योग समूहात जे जे काम करता ते अधिक गुणवत्तापूर्वक निर्मिती कशी करता येईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहावे. कामाच्या ठिकाणी आपल्या बुद्धिबरोबरच प्रसंगी कौशल्यात भर कशी पडेल यासाठी स्वतःला झोकून द्यावे. आपल्या उद्योगसमूहाचा व आपण करीत असलेल्या विभागाचा अभिमान प्रत्येकाने बाळगून काम करताना चुका झाल्यातर भविष्यात त्याची पुनरावृत्ती भविष्यात होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकानी घ्यावी, अशी कृती अंगिकारली तर स्वतःचा, उद्योग समूहाबरोबरच देशाचा विकासदेखील होईल. स्पर्धेचे परिषण जान्हवी यादव, पवनकुमार रौंदळ, आनंत क्षीरसागर यांनी केले. सूत्रसंचालन विजया रुमाले यांनी तर संयोजनासाठी ललिता परदेशी, चंद्रशेखर रुमाले, प्रशांत बोराटे यांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here