साक्री येथील प्रचिती स्कूलतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थिनींसाठी महाभोंडलाही आयोजित करण्यात आला होता. या वेळी संगीत खूर्चीसह विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शिक्षिकांनी विविध गाण्यांचे या वेळी सादरीकरण केले. रास दांडिया आणि गरब्याचा आनंदही या वेळी विद्यार्थ्यांनी घेतला. शाळेच्या शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी संयोजन केले.
साक्रीच्या प्रचिती स्कूलमध्ये रंगला महाभोंडला
