पुणे : भविष्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्वत:च्या प्रचारासाठी सार्वजनिक निधी, सार्वजनिक जागा अथवा सरकारी साधनांचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. दरम्यान, या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे आगामी काळात सार्वजनिक सुविधांचा वापर करून स्वत:चा किंवा पक्षचिन्हाचा प्रचार करणार्या राजकीय पक्षांना चाप बसणार आहे.