पिंपरी : निगडी येथील सार्थक भालेकर वय वर्ष अवघे दहा मात्र त्याचे यश हे नेत्रदीपक आहे. सार्थक ने एवढ्याशा वयात अॅबॅकस या बुद्धिमत्तेची कसोटी लावणार्या स्पर्धेत त्याने सिंगापोर येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत त्याने चॅम्पियनशिप मिळवली आहे.
सार्थक हा निगडी येथील तळवडे भागात राहतो. त्याने गेल्यावर्षी म्हणजे वयाच्या नवव्यावर्षी राज्य पातळीवरची अॅबॅकसच्या परिक्षेत तिसरा क्रमांक मिळवला. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास चांगलाच वाढला. त्यानंतर त्याने फेब्रुवारी 2016 मध्ये राष्ट्रीय पातळीवरची अॅबॅकसस्पर्धेत चॅम्पियनशीप मिळवली. यानंतर त्याला सिंगापोर मधील आंतरराष्ट्रीय परिक्षेची माहिती मिळाली व त्याने ही कल्पना घरी बोलून दाखवली. घरच्यांनाही त्याच्या या स्वप्नाला बळ दिले. याविषयी बोलताना सार्थक म्हणाला की, आई-बाबांनी सांगितले की जिंकणे किंवा हारणे हा पुढचा प्रश्न आहे. त्यामुळे तू सहभागी तरी हो असे म्हणत मला आधार दिला. माझीही इच्छा होती व माझे स्वप्न पूर्ण झाले.
यावेळी सार्थकची तिथे निवड चाचणीसुद्धा अगदी कठीण पातळीवरची असल्याने तिथे गुणवत्ता चांगलीच तपासली जात होती. त्यात 12 देशातून सुमारे 110 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामुळे स्पर्धाही कठीण होती. मात्र या सार्यावर मात करत सार्थकने या स्पर्धेचीही चॅम्पियनशिप मिळवली.
याविषयी सार्थकची आई सुनिता भालेकर म्हणाल्या की, सार्थककडून एवढ्या मोठ्या यशाची अपेक्षा नव्हती. तरी त्याने ते करून दाखवले याचा आम्हाला खूप आनंद आहे. तो लहान असल्यामुळे आम्ही कधी त्याच्यावर कुठल्याच गोष्टीचा दबाव नाही आणत मात्र त्याने शास्त्रज्ञ व्हावे अशी आमची इच्छा आहे. त्याने पुढे साथ दिली तर आमची त्यासाठी पूर्ण तयारी आहे.