पिंपरी : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे जीवन अत्यंत आदर्श, प्रेरणादायी व चारित्र्य संपन्न, होते. ते अजातशत्रू म्हणून सर्व भारतीयांना परीचित आहे, असे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्यप्रशासकीय इमारतीत लावण्यात आलेल्या त्यांच्या तैलचित्राचे अनावरण आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रामाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे होत्या.
या वेळी आमदार महेश लांडगे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते विठठल ऊर्फ नाना काटे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, विधी समिती सभापती अश्विनी बोबडे, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, फ प्रभाग अध्यक्षा योगिता नागरगोजे, ग प्रभाग अध्यक्षा अर्चना बारणे, नगरसदस्या सीमा सावळे, आशा धायगुडे – शेंडगे, अनुराधा गोरखे, शैलजा मोरे, कमल घोलप, झामाबाई बारणे, माजी नगरसदस्या उमा खापरे, नगरसदस्य शितल ऊर्फ विजय शिंदे, नामदेव ढाके, लक्ष्मण उंडे, स्विकृत सदस्य बाबू नायर, माऊली थोरात, मोरेश्वर शेडगे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, माहिती व जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण राणे, शैला मोडक, अजय पाताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार अमर साबळे म्हणाले, माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी देशावर अखंड श्रध्दा ठेवून विचार धारेतून कार्यकर्त्यांवर संस्काराचे बिजारोपन केले असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी मानले.