राष्ट्रवादी काँग्रेस आणि कामगार कष्टकरी संघटनेतर्फे आंदोलन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास (पीसीएनटीडीए) प्राधिकरणामधील पेठ क्रमांक 17 व 19 चिखली येथे जेएनयुआरएम अतंर्गत अडीच एफएसआयनुसार बांधकाम झालेल्या नव्या गृहप्रकल्पाच्या बांधकामांना पीसीएनटीडीए ने परवानगी द्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व कामगार कष्टकरी संघटनेतर्फे प्राधिकरणाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षनेत्या मंगला कदम, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते योगेश बहल, माजी महापौर राजू मिसाळ, फजल शेख, तानाजी खाडे, कामगार व कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष बाबा काबंळे आदी या वेळी उपस्थित होते.
आंदोलनकर्ते आणि मोर्चाकर्र्यांकडून या वेळी विभागीय आयुक्त एस. चोकलिंगम यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिखली येथील घरकुल प्रकल्पाअंतर्गत 160 इमारती बांधण्याचे काम 2009 साली सुरू झाले आहे. त्यातील 1.36 एफएसआयच्या गृहप्रकल्पाचे काम झाले आहे; मात्र दि. 25 फेब्रुवारी 2016 च्या उच्च न्यालयाच्या परवानगीनुसार अडीच एपएसआच्या गृहप्रकल्पांना मान्यता देऊनही प्राधिकरण त्यांना नियमित का करत नाहीत किंवा त्यांच्या बांधकामाला परवानग्या का देत नाहीत, असा सवाल या निवेदनातून करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध काही विरोधक सर्वोच्च न्यालयात गेले होते. ती याचिका ही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. तरी काही राजकीय दबावामुळे या भागातील शाळा, दवाखाने यांच्या बांधकामात अडथळा निर्माण होत आहे व नागरिकांना मुलभूत गरजाही मिळू शकत नाहीत. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना याचा फटका बसत आहे. तरी न्यायालयाच्या निर्मयचा आदर करत कामाला गती द्यावी व ज्या अधिकार्यांमुळे कामात दिरंगाई होत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. व संबंधितांना त्वरित सुधारित बांधकामांना परवानगी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.