साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. शुक्रवार दि. ३ जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्रचिती प्री प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. त्यानंतर इयत्ता ८ वी वर्गातील विद्यार्थीनी पल्लवी वाघ हिने आजच्या स्त्री ची परिस्थिती सर्वांसमोर मांडली. प्राचार्य अतुल देव यांनी सावित्रीबाई विषयी विचार मांडले. ते म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी कठोर परिश्रम आणि खडतर प्रसंगातून मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्यांनी मुलींना वेद-पुराण न शिकवता विज्ञान, सामाजिक शास्त्र, गणित या विषयांचे ज्ञान दिले. प्राचार्या भारती पंजाबी यांनी सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणासाठी केलेल्या संघर्षाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

शाळेतील शिक्षिका स्मिता नेरकर यांनी सावित्रीबाईंमुळे आज आपण वाचन-लेखन करू शकत आहोत, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश बेडसे यांनी केले.