साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे विजयादशमीनिमित्त रावण दहन करण्यात आले. प्राचार्य मोहन गावित या वेळी उपस्थित होते. प्रांजली जोशी यांनी दसर्याविषयी या वेळी विद्यार्थ्यांना माहिती दिली. अनिता पाटील यांनी दसर्याचे महत्व विषद केले. समन्वयक राहुल अहिरे यांनी आपट्याच्या पानांबाबत माहिती दिली. पूनम तवर, अर्चना पाटील, पूनम बिरासीस, जयेश घरटे आणि संगिता कोठावदे यांनी संयोजनात पुढाकार घेतला. कृषाली भदाणे यांनी सूत्रसंचालन केले.