Chaupher News
साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये (साक्री, जि. धुळे) वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक प्रशांत पाटील, आई एकविरा फौंडेशनच्या सेक्रेटरी कविता पाटील, प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, प्राचार्य वैशाली लाडे, व्यवस्थापक तुषार देवरे, वैभव सोनवणे, राहुल पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या म्हणून स्वाती शेवाळे, रजूबाई सूळ, सविता अहिरराव, विद्या मोगरे, मनीषा देवरे, वैशाली साळुंके, मीना आडगळे, रजनी पाटील, कविता सोनवणे, जयश्री भागवत, भारती अहिरे या महिला मातांची प्रमुख उपस्थिती होती.


कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या औक्षणाने व नृत्य देवता नटराज, शिवप्रतिमा, सरस्वती पूजनाने झाली. यावेळी सर्व अतिथींचे बुके, पुस्तक व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नवरस या Theme Song तसेच Welcome Song ने करण्यात आली. या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे नृत्य, नाटक, मल्लखांब, रोप मल्लखांब, स्केटिंग डांन्स, कराटे प्रकार सादर केले. चिमुकल्यांनी सादर केलेल्या या कला अविष्कराने सारेच भारावून गेले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे नियोजन स्वाती अहिरे यांनी केले. आकर्षक रांगोळी रेखाटन वैशाली पाटील, योगिता देसले, गितल कोठावदे, शितल सोनवणे, स्वाती अहिरे यांनी, स्टेज डेकोरेशन भुपेंद्र साळुंके यांनी तर उत्कृष्ट छायाचित्रण नितीन राजपूत यांनी केले. सूत्रसंचालन वैशाली पाटील व जयेश शर्मा यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.