Chaupher News
दिल्ली : संपूर्ण देशातीचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘हॅटट्ट्रीक’ करण्याच्या तयारीत आहेत. एकूण ७४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल ५७ जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी केवळ १३ जागांवर आघाडीवर दिसत आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अद्याप खातेही उघडता आलेले नाही.
आम आदमी पक्षाने 2013 मध्ये पहिल्यांदा निवडणूक लढताना 70 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या , भाजपने 31 तर काँग्रेसने 8 जागांवर विजय मिळविला होता. मात्र जास्त जागा मिळूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नव्हती. यावेळी आपने काँग्रेसला सोबत घेउन सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार केवळ 49 दिवसच टिकले. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनाम दिला होता. पुन्हा झालेल्या निवडणुकीत आपने 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकून पूर्ण बहुमत विळविले होते. आता पुन्हा किमान 55 जागा मिळण्याची शक्यता दिसत आहे.