पिंपरी (दि. 18 ऑक्टोबर 2016) : आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये थ्रीडीपीएलएम सॉफ्टवेअर सोल्यूशन या कंपनीच्या वतीने उभारण्यात आलेल्या प्रॉडक्ट इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन ट्रस्टचे विश्वस्त भाईजान काझी यांच्या हस्ते झाले. यावेळी एमकेसीएलचे व्यवस्थापक डॉ. अजित वाडेगावकर, थ्रीडीपीएलएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन मोगासले, प्राचार्य डॉ. अ. म. फुलंबरकर, विभाग प्रमुख डॉ. पी. जी. अवसरे, अधिष्ठाता डॉ. शितल भंडारी, डॉ. जयंत उमाळे, प्रा. शितलकुमार रवंदळे, विभाग प्रमुख डॉ. एस.एस. लकडे, थ्रीडीपीएलएमचे हुजेफा सलीम, हेमंत गाडगीळ, मिलींद देसाई, विनायक फुटाणे, श्री राजीव, महेंद्र गुरव, प्रशांत भट, दिघी येथील ए. आय. टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आदी उपस्थित होते.
सुदर्शन मोगासले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या विविध संकल्पना पूर्णत्वास आणण्यासाठी प्रॉडक्ट इनोव्हेशन लॅबचा उपयोग करता येईल. डॉ. अजित वाडेगावकर म्हणाले की, अभियांत्रिकी क्षेत्रातील बहुतांशी सर्व विभागात वापरली जाणारी इंडस्ट्री 4.0 ची संकल्पनेची माहिती दिली. ही लॅब सर्व अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी व प्राध्यापकांसाठी खुली असल्याचे सांगितले. या लॅब अतंर्गत दहा नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट येत्या वर्षात करण्यात येतील. या लॅबसाठी प्रा. संजय माटेकर, प्रा. राहुल गुजर, प्रा. चंदन इंगोले, प्रा. देवेश कुटे मार्गदर्शन करणार आहेत. स्वागत प्राचार्य डॉ. अ. म. फुलंबरकर यांनी केले. सुत्रसंचालन नेहा बिरादार व विनय गुम्मा यांनी केले. प्रा. संजय माटेकर यांनी आभार मानले.
पीसीईटीच्या अभियांत्रिकी महाविद्यात इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन
