DCIM100MEDIADJI_0179.JPG

Chaupher News

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी २०२० जत्रेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. पवनाथ़डीचे उद्घाटन ४ मार्च रोजी नवी सांगवीच्या पी.डब्ल्यू.डी मैदानावर झाले. पहिल्या दिवसापासूनच पवनाथडीला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. यंदाच्या जत्रेमध्ये प्रवेशद्वारापासूनच वैविध्यपूर्ण सजावट पाहायला मिळाली.

रविवारी (दि. ८) कार्यक्रमाच्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, जैवविविधता व्यवस्थापन समिती सभापती उषा मुंढे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडीगेरी, नगरसदस्य सागर अंघोळकर, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नगरसदस्या शारदा सोनवणे, आरती चौंधे, सिमा चौघुले, सविता खुळे, माधवी राजापुरे, भिमाताई फुगे, चंदा लोखंडे, स्वीकृत सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, माजी नगरसदस्य राजू दुर्गे, नगरसचिव तथा सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, रमेश भोसले, सहा. समाज विकास अधिकारी सुहास बहाद्दरपुरे व मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.

खास जागतिक महिला दिनानिमित्त अक्षय घोळवे प्रस्तुत खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये शेकडो महिलांनी कार्यक्रमात भाग घेतला. सांगवी येथील युगांती संजय पारळे या पैठणीच्या मानकरी ठरल्या तर तुळजापुर येथील सुनिता सतिश हुडेकर यांना द्वितीय तर सोनाली मनोज चौधरी यांचा तृतीय क्रमांक आला. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर पवनाथडीचा समारोप एस. के. प्रॉडक्शनच्या प्रमुख सुजाता कांबळे प्रस्तुत “ लावण्यसुंदरी ” ह्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रमाने झाला. यामध्ये चित्रपट अभिनेत्री शितल चोपडे, अंजली राजे, राही संगमनेरकर, साधना जोशी, बाळूमामा मालिका फेम पाटीलबाई, स्वाती थोपटे यांनी एकापेक्षा एक सरस लावण्या सादर करून केलेल्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकली.

या रावजी बसा भावजी, झाल्या तिन्ही सांजा, दिसला गं बाई दिसला, बाई मी लाडाची, रेशमाच्या रेघांनी, खेळताना रंग बाई होळीचा होळीचा इत्यादी बहारदार लावण्या सादर करण्यात आल्या. एकंदरीत लक्षवेधी असलेली सजावट यामुळे दरवेळी पेक्षा यंदाची पवनाथडी विशेष असल्याचे जाणवली आहे. केवळ खरेदी विक्री आणि स्टॉल या पुरते मर्यादित न राहता सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही पवनाथडीत पाहायला मिळाली आहे. महिलांना तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न पवनाथडीचा झाला असल्याचे महापौर माई ढोरे यांनी सांगितले तसेच जाहीर केल्याप्रमाणे दररोज सायंकाळी वेगवेगळ्या स्थानिक आणि इतर संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची संधी महापालिकेने दिलेली आहे असेही त्या म्हणाल्या.

८ मार्च रोजी शाकाहारी स्टॉलवरून रक्कम रू. ७५ लाख तर मांसाहारी स्टॉलवरून ९५ लाख व इतर स्टॉलवरून ४५ लाखाची उलाढाल झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका शुभांगी शिंदे व किशोर केदारी यांनी केले तर आभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here