Chaupher News

राज्य शासनाच्या महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीवर सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तसा आदेश शासनाच्या नगरविकास विभागाने पालिका प्रशासनला पाठविला आहे.

तसेच यापुर्वी नुकतेच पिंपरी-चिंचवड महापालिकेत नाशिकचे प्रशांत जोशी आणि औरंगाबादचे बाळासाहेब खांडेकर यांची पदोन्नतीने सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्ती झाली आहे. ते 26 फेब्रुवारी रोजी महापालिकेत रुजू झाले आहेत.

पिंपरी महापालिकेत 11 सहाय्यक आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यात 6 राज्य शासनाने दिलेले प्रतिनियुक्‍तीवरील आणि 5 महापालिकेचे अधिकारी असा कोटा आरक्षित आहे. पिंपरी महापालिकेत राज्य सरकारच्या सेवेतील ‘सीईओ’ केडरचे मध्यवर्ती भांडार विभागाचे मंगेश चितळे, करसंकलन विभागाच्या स्मिता झगडे, स्थानिक संस्था कर विभागाचे सुनिल अलमलेकर, आकाश चिन्ह परवाना विभागाचे बाळासाहेब खांडेकर, भूमि व जिंदगी विभागाचे प्रशांत जोशी कार्यरत आहेत. आता नवीन मिनल कळसकर यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाल्याने शासनाचा 6 सहायक आयुक्त राखीव कोटा पुर्ण झाला आहे.

तर, महापालिकेतील प्रशासन विभागाचे मनोज लोणकर, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे चंद्रकांत इंदलकर, ‘अ’ प्रभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘ह’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, ‘क’ प्रभागाचे अण्णा बोदडे असे पाच सहायक आयुक्त कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here