Chaupher News

पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये एक कोरोनाची संशयित महिला रुग्ण आढळली आहे. महिलेसह कुटुंबातील आठ जणांना उपचारासाठी नायडू रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. पुण्यात कोरोना व्हायरसचे पाच रुग्ण आढळल्यानंतर सगळीकडे भीतीचं वातावरण आहे. आता पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना व्हायरसची संशयित महिला आढळल्याने घालवाल माजली आहे.

संबंधित महिला 27 फेब्रुवारीला दुबईतून भारतात परतली होती. त्यानंतर कालपासून तिच्यात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती, तिला याचा त्रासही होऊ लागला होता. तातडीने खबरदारी म्हणून महिलेला पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या महिलेसह तिच्या कुटुंबातील आठ व्यक्तींनाही नायडू रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या सर्वांना कोरोनाही लागण झाली आहे का, हे स्पष्ट होईल. संबंधित महिला 21 फेब्रुवारीला दुबईत गेली होती. त्यानंतर भारतात परतल्यानंतर ती कुणाकुणाला भेटली याचीही माहिती आता घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here