नारायण राणेंची दापोडीत रविवारी सभा
पिंपरी (दि. 18 ऑक्टोबर 2016) आगामी सार्वत्रिक निवडणूकीत सर्व प्रभांगामध्ये सर्व जागांवर कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार उभे करुन निवडणूकीला सामोरे जाण्याची रणनिती कॉंग्रेस पक्षाकडून आखली जात आहे. आजी माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी, ज्येष्ठ व युवक कार्यकर्त्यांशी चर्चा करुन प्रदेश कमिटीला अहवाल सादर करुन मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केले.
पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात प्रमुख पक्षपदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मंगळवारी (दि.18) आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम, एआयसीसीच्या सदस्या निगार बारसकर, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक रामचंद्र माने, तुकाराम भोंडवे, ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा ज्योती भारती, सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब सांळुके, संदेश नवले, अल्पसंख्यांक विभाग प्रदेश सचिव मॅन्युअल डिसूजा, राजेंद्र सिंह वालिया, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष मयुर जैसवाल, एनएसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, तानाजी काटे, शहर उपाध्यक्ष ॲड. क्षितीज गायकवाड, संदिपान झोंबाडे आदी उपस्थित होते.
या बैठकीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांनी आगामी निवडणूकीबाबत मनोगते व्यक्त केली. तसेच रविवारी (दि. 23) माजी मुख्यंमत्री नारायण राणे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती साठे यांनी दिली. दापोडीतील डॉ. बाबासाहेब पुतळा चौक येथे आयोजित केलेल्या सभेत माजी मंत्री, पक्ष निरीक्षक चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, चंद्रकांत छाजेड, बाळासाहेब शिवरकर, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव वाघमारे, डॉ. रत्नाकर महाजन, पक्ष निरीक्षक व प्रदेश सरचिटणीस अलका राठोड आदी उपस्थित होते.
सर्व जागांवर निवडणूक लढविण्याची रणनिती…..सचिन साठे
