Chaupher News

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, सेक्टर २२, आझाद चौक, ओटा स्किम निगडी येथे महापालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्राचा शुभारंभ महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झाला.

यमुनानगर आरोग्य वर्धिनी केंद्रात स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, दंतचिकित्सा, फिजिशियन, आयुर्वेद, योगा व ध्यानधारणा या सेवा देण्यात येणार आहेत. याचबरोबर टप्प्याटप्याने प्रसुतीपुर्व व प्रसुती पश्चात काळजीपुर्वक माताबाल सेवा पुरविणे, अर्भक व बालक आरोग्य सेवा पुरविणे, लहान व किशोरवयीन मुला-मुलींसाठी आरोग्य सेवा पुरविणे, कुटुंब नियोजन, संतती प्रतिबंध सेवा व इतर प्रजनन ब बाल आरोग्य सेवा पुरविणे, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत साथरोग सेवा पुरविणे, साध्या संसर्गजन्य आजरांवर उपचार व किरकोळ आजारांवर बाहयरुग्ण सेवा पुरविणे, असंसर्गजन्य रोग तपासणी, उपचार, नियंत्रण व प्रतिबंधाकरीता सेवा पुरविणे, नेत्र व कान-नाक-घसा संबंधित उपचार व किरकोळ आरोग्य सेवा पुरविणे, मौखिक आरोग्य सेवा पुरविणे, वयोवृध्द नागरीकांकरीता आरोग्य सेवा पुरविणे, अपात्कालीन आरोग्य सेवा पुरविणे, मानसिक आरोग्य संबंधित मुलभुत उपचार व व्यवस्थापन करणे, रुग्णांकरीता योग वर्गाचे आयोजन करणे या १३ सेवा पुरविण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमास स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, उत्तम केंदळे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अतिरिक्त आरोग्य वैद्यकिय अधिकारी डॉ. पवन साळवे, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निलकंठ पोमण, महिला वैद्यकिय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. संध्या भोईर, डॉ. कल्पना गडलिंकर, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या उज्वला गोडसे, सीटीओ कार्यालयाचे बारबरा, अनुप फणसे व माहिती व जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले हे उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here