Chaupher News
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केलेल्या पाच संशयितांपैकी तीन रुग्णांच्या द्रावाचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखणे महापालिका प्रशासनासमोर आव्हान आहे, अशी माहिती आयुक्त श्रवण हर्डीकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री पत्रकार परिषदेत माहिती दिलेले आणखी तीन पॉझिटीव्ह रुग्ण हे पिंपरी-चिंचवडमधील होते, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची एकूण संख्या 11 कायम आहे. आज (गुरुवारी) पुणे शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी साांगितले.