चौफेर न्यूज – भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज शनिवार दि. 4 रोजी महापालिका प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात या उपक्रमाचे उदघाटन महापौर माई उर्फ उषा ढोरे यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून झाले. यावेळी, सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर तुषार हिंगे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, अपक्ष गटनेते कैलास बारणे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, डॉ. अनिल रॉय, डॉ. पवन साळवी, अण्णा बोडदे, भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विरेश छाजेड, फोर्स मोटर्सचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी 4 अँबुलेन्स आणि डॉक्टर – नर्स यांच्यासाठी 1 बस अशी पाच वाहने शहरातील नागरीकांसाठी कार्यरत राहणार आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा मिळावी, या उद्देशाने डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात असल्याचे सत्तारूढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांनी यावेळी सांगितले.
डॉक्टर आपल्या दारी उपक्रमाचे उदघाटन





















