3D illustration of Coronavirus, virus which causes SARS and MERS, Middle East Respiratory Syndrome
पिंपरीचिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात संशयित म्हणून दाखल झालेल्या 47 जणांचे रिपोर्ट आज (शनिवारी) निगेटीव्ह आले आहेत. त्यामध्ये दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांच्या सहवासातील व्यक्तींचे देखील रिपोर्ट आहेत. तसेच पहिल्या बारापैकी बाराव्या रुग्णाचे दुसरे रिपोर्टही निगेटीव्ह आले असून, त्याला आज घरी सोडले आहे. यामुळे शहरात आता दिल्लीतून आलेले दोन आणि त्यांच्याहाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एक असे तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. पिंपरीचिंचवड शहरात 12 मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण पॉझिटीव्हआढळले होते. त्यानंतर लागोपाठा बारा रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यातील पहिले तीन रुग्ण 27 मार्च रोजीकोरोनामुक्तहोत ठणठणीत बरे झाले. तर, 28 मार्च रोजी आणखी सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर 31 मार्च रोजी एक आणि 2 एप्रिल रोजी एक असे दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. त्यानंतर पहिल्या बारापैकी शेवटच्या रुग्णांचे दुसरे रिपोर्टही आज शनिवारी (दि.4) निगेटीव्ह आले. त्यामुळे या रुग्णाला घरी सोडण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी जमातच्या मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरीचिंचवड शहरात आलेल्या 23 नागरिकांपैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी (दि.2) स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांच्याहाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एकाला शुक्रवारी (दि.3) कोरोनाची लागण झाल्याचे रिपोर्ट आले. त्यामुळे शहरात आता कोरोनाचे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. संशयित म्हणून महापालिका रुग्णालयात दाखल झालेल्या 47 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमातून आलेल्या नागरिकांच्या सहवासातील सर्व व्यक्तींचे देखील रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आताहाय रिस्क कॉन्टॅक्टमधील पॉझिटीव्ह रुग्णाच्या नातेवाईकाचे रिपोर्ट येणे बाकी असल्याचे, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे. दरम्यान, पिंपरीचिंचवड शहरात आजपर्यंत कोरोना पॉझिटीव्ह 15 आढळले होते. त्यापैकी पहिले बारा रुग्णकोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तीन पॉझिटीव्ह रुग्णांवर महापालिका आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here