पिंपरी : राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक कार्यक्रम पत्रिकेनुसार 10 ऑक्टोबरपासून निवडणूक आयोगाकडे प्रभाग हरकती जमा केल्या जात आहेत. त्यामध्ये स्थानिक आमदारांपासून ते नागरिकांपर्यंत अशा केवळ दहा दिवसात एकूण 940 हरकती पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे जमा झाल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची वादग्रस्त प्रारुप प्रभागरचननेवर आमदार महेश लांडगे यांनी भोसरी व मोशीतील दोन प्रभागांबाबत हरकती घेतल्या आहेत. तसेच, नगरसेवकांपैकी निता पाडाळे, अरुण टाक, मंदाकिनी ठाकरे, धनंजय आल्हाट, आशा सूर्यवंशी, सुभद्रा ठोंबरे, वंसत लोंढे यांनीही निवडणूक विभागाकडे हरकती नोंदविल्या आहेत. तर केवळ एकट्या तळवडे प्रभागातूनच 840 हरकती आल्या आहेत.
यामध्ये त्यात नागरिकांनी प्रभाग क्रमांक 1 व प्रभाक क्रमांक 12 या दोन प्रभागातील समाविष्ट भागांबद्दल आक्षेप घेण्यात आले आहेत. तसेच, हरकतींमध्ये आमदार महेश लांडगे जवळपास सगळ्याच हरकती या चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या प्रभागांबाबत