विकास नामदेव साने यांची आपली चिखली मधील तीन एकर जागा कोविड सेंटर साठी देण्याची तयारी
चौफेर न्यूज – करोनाचे भयंकर संकट “आ “वासून आपल्या आजूबाजूच्या हजारो लोकांना रोज गिळंकृत करत असताना मन सुन्न होते. या सगळ्यामध्ये आपण लोकांना मदत करून खारीचा वाटा उचलावा या प्रामाणिक हेतूने मी माझी ३०००० sq.ft सर्व सेवा सुविधा युक्त वेअरहाऊस आणि आजूबाजूची ३ एकर जागा कोविड सेंटरला देण्यासाठी उच्चस्तरीय राजकीय तसेच प्रशासन स्थरावर सर्व प्रकारे प्रयत्न करून पहिले .मला सर्वानी साकारत्मता दाखवली परंतु अजूनही काहीच हालचाली किंवा क्रिया झाली नाही.
मी गेली १५ ते २० दिवस या यासाठी धडपडतोय. या काळात सर्व व्यावसायिक आणि राजकीय भूमिका बाजूला ठेऊन मी, हे वेअरहाऊस,तसेच ४०० बेड आणि रोज लागणारे जेवण मोफत देण्यास तयार आहे, एव्हडेच नाही तर यापलीकडे जी काही मदत लागेल ती मी देण्यास तयार आहे. फक्त एकच प्रामाणिक उद्देश आहे कि लोकांचे जीव वाचले पाहिजेत आणि सगळ्यांना उपचार मिळाले पाहिजेत .
या तळमळीने मी नाईलाजास्तव हा विडिओ पाठवत आहे ,आपणही हा व्हिडिओ पुढे पाठवा . माझा हा व्हिडिओ पाहून कोणाला जरी वाटले कि आपण या कामात मदत करून कोविड सेंटर उभारणीत मदत करू शकतो तर कृपया मला ९९२२३९९६९९ या क्रमांकावर संपर्क करून सहकार्य करावे अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
आपला
श्री विकास नामदेव साने ९९२२३९९६९९