पिंपरी : पुण्यातील मेळाव्याच्या जाहिरातींवर छापण्यात आले आहे उजवीकडून डावीकडे जाणारे इंजिन
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन पुन्हा एकदा उजवीकडून डावीकडे धावणार आहे. नव्या दिशेने धावणारे हे इंजिन पुण्यातील मेळाव्याच्या जाहिरातींवर छापण्यात आले आहे.
या आधी 2012 पर्यंत या इंजिनाची दिशा डावीकडे होती. मात्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या पराभवामुळे या इंजिनाची दिशा बदलण्यात आली असल्याचे समजते. मात्र, 2012 च्या महापालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळाल्याने आणि मराठीच्या मुद्द्यावर लढणार्या पक्षाचं चिन्हं मराठी भाषा ज्या प्रमाणे लिहितात त्याप्रमाणेच म्हणजे उजवीकडे धावणारे हवे यावर एकमत झाले आणि इंजिनची दिशा बदलण्यात आली. दरम्यान, सध्याच्या स्थितीला मनसेचे इंजिन थेट यार्डातच पोहचल्याने आगामी पालिका निवडणुकांसाठी इंजिनाच्या दिशेत नवा बदल करण्याचा सल्ला वास्तूतज्ञांनी दिला आहे. त्यामुळे इथून पुढे करण्यात आलेला हा बदल पक्षासाठी किती फायदेशीर ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.