परिवहन मंत्री ना. नितीन गडकरींना निवेदन
धुळे : शहरातून जाणार्या साक्रीरोडसाठी रस्ते विकास कार्यक्रमांतर्गत अनुदान उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी महापौर कल्पना महाले यांनी केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
ना.गडकरी धुळे दौर्यावर असतांना महापौर महाले व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी त्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी ना. जयकुमार रावल, भाजयुमोचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राम भदाणे व अन्य मान्यवर उपस्थित होते. शहरातून जाणारा सूरत-नागपूर महामार्ग अर्थात साक्रीरोड संतोषी माता चौक ते मनपा हद्दीपर्यंत सर्वांत जास्त वाहतुकीचा व वर्दळीचा आहे. या रस्त्यावरुन ग्रामीण भागातील वाहतूकही मोठया प्रमाणात होते. या रस्त्यावर अनेक दवाखाने, शैक्षणिक संस्था व मुख्य
बाजारपेठ आहे.
हा रस्ता अरुंद असून प्रचंड वाहतुकीमुळे अनेकदा अपघाताचे प्रसंग निर्माण झालेले आहेत. या भागात वसाहतींमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व रस्त्याची स्थिती लक्षात घेता रस्ता रुंदीकरण व नुतनीकरण होणे आवश्यक आहे.
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असून रस्ते विकास निधीअंतर्गंत निधी उपलब्ध झाल्यास वाहतुकीचा प्रश्न निकाली निघणार आहे. तरी रस्त्याचे रुंदीकरण, नुतनीकरण करणे तसेच रस्ता दुभाजक, मध्यवर्ती विद्युत खांब, दोन्ही बाजुस गटारी या कामांसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही निवेदनात नमूद
केले आहे.