धुळे : शहरातील नाट्य कलावंत व अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या धुळे शाखेतर्फे 173 व्या मराठी रंगभूमी दिनानिमित्त राजर्षी शाहू महाराज नाट्यगृहात नटराज पूजन व रंगभूमी पूजन करण्यात आले. यावेळी कलावंतांनी गीत, नाटक सादर केले तसेच नाट्य चळवळ अधिक बळकट करण्याचा मनोदय व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात रंगकर्मी संदीप पाचंगे व पारिजात चव्हाण यांच्या हस्ते नटराजास पुष्पहार अर्पण करुन तसेच श्रीफळ वाढवून करण्यात आली. तर जगदीश देवपूरकर यांनी नाटकाची नांदी सामूहिक रित्या गाऊन कार्यक्रमात भर घातली. याप्रसंगी ’झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकातील एक प्रवेश सादर करण्यात आला. तसेच नाट्यगृहाचे ठेकेदार यांनी नाट्यगृहात नुकत्याच सुधारित केलेल्या सर्व सुखसोयी याची सर्व कलावंतांना सविस्तर माहिती देऊन योग्य ते सहकार्य कायम देण्यास सहमती दर्शविली. सदर कार्यक्रमातून सर्व कलावंतांनी एकमेकांसोबत कायम राहत ही नाट्य चळवळ अधिकाअधिक पुढे नेण्यासाठी परिपूर्ण प्रर्यंकरू, असे सांगितले.
याप्रसंगी शहरातील नाट्य कलावंत मुकेश काळे, पारिजात चव्हाण, संकेत बडगुजर यांच्यासह अनेक कलावंत व नाट्यगृहाचे ठेकेदार राजू भावसार उपस्थित होते