चौफेर न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सीबीएससी बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसात निर्णय घेऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज सरकारने आपला निर्णय जाहीर करत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. कोविड आणि भागधारकांकडून मिळालेल्या अभिप्रायामुळे तसेच सध्याची अनिश्चित परिस्थिती लक्षात घेता यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षा होणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला आहे. सीबीएसई वेळ-मर्यादित पद्धतीने परिभाषित उद्दीष्ट मापदंडानुसार इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल संकलित करण्यासाठी पावले उचलणार आहे.





















