पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करा ः आलगुडे
पिंपरी ः नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची झचझचङ च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर मुकारी अलगुडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई मोहीम सुरू केली. याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी त्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. यासंबंधित प्रस्ताव राज्य सरकारकडे गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यास स्थगिती दिली आहे.
या विषयी उपमहापौर मुकारी आलगुडे म्हणाले की, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी मागील काही महिन्यापूर्वी ज्या अधिका-याची नेमणूक करण्यात आली. त्यांनी देखील अद्यापपर्यंत पदभार स्वीकारला नाही. यामुळे सार्वजनिक वाहतूक कोलमडली आहे.
नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या सारखा अधिकारी झचझचङ ला मिळाल्यास शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल.