पिंपरी ः पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. किरण पवार यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी प्रतीक जगताप यांची निवड करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेटस बार असोसिएशनच्या 748 सभासदांपैकी 548 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी अॅड. किरण पवार, उत्तम फाळके, गोरक्षनाथ झोळ यांच्यात लढत झाली. उपाध्यक्षपदी प्रतीक जगताप विजयी झाले त्यांना 445 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी म्हणून सुनील जामनी यांना 91 मत पडली. उपाध्यक्षपद 354 मतांनी विजयी झाले.
सचिवपदी अॅड. मुकुंद ओव्हाळ व अॅड. सविता तोडकर यांची बिनविरोध निवड झाली. सहसचिवपदी अॅड. दिलीप शिंगोटे बिनविरोध निवड झाले. खजिनदारपदासाठी अॅड. प्रमिला गाडे यांना 323 मते पडली. प्रतिस्पर्धी म्हणून अॅड. हर्षद नढे यांना 220 मते पडली. 103 मतांनी अॅड. प्रमिला गाडे विजयी झाल्या. हिशेब तपासणीस म्हणून अॅड. काजल अनिल वायकर यांना 278 मते पडली. तर प्रतिस्पर्धी म्हणून अॅड. सचिन पाळेकर यांना 262 मते पडली. 16 मतांनी अॅड.काजल वायकर विजयी झाल्या. सभासदपदी अॅड. किरण सोनवणे, अॅड. दुर्गेश जमादार, अॅड. अमिकेत कदम, अॅड. सनी काटे यांची बिनविरोध निवड झाली. मुख्य निवडणूक कार्यकारी समिती म्हणून अॅड.सुभाष चिंचवडे, अॅड.उत्तम चिखले, अॅड. देवराव ढाळे, अॅड. विलास कुटे, अॅड.सुहास पडवळ, अॅड.संजय दातीर पाटील, अॅड.अनिल तेजवानी, अॅड.विजय शिंदे,अॅड. सुशील मंचरकर यांनी काम पाहिले.