चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता नववीतील विद्यार्थी ब्ल्यू हाऊस, रेड हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस हाऊसच्या लीडर्सची निवड त्या त्या हाऊस मधील विद्यार्थ्यांच्या मतदान द्वारे घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेतून दहा लीडर्स ची निवड करण्यात आली .मुख्य प्रतिनिधींची निवड प्रक्रियेसाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांचे मतदान घेण्यात आले .या मतदान प्रक्रियेतून ब्ल्यू हाऊसची समीक्षा वाणी (380) मतांनी निवडून आली. ग्रीन हाऊस चा खुशाल पाटील (393) मतांनी निवडून आला. या निवडून आलेल्या दहा प्रतिनिधींची अनुक्रमे1) ग्रीन हाऊस खुशाल पाटील हेड बॉय (प्रेसिडेंट)२) ब्ल्यू हाऊस समीक्षा वाणी हेड गर्ल( व्हॉइस प्रेसिडेंट)३) ब्ल्यू हाऊस तनुश्री राणे (सेक्रेटरी)4) ग्रीन हाऊस यशिका भामरे( कोकरिक्युलम कॉर्डिनेटर)5) रेड हाऊस कृष्णा अकलाडे( लैंग्वेज फोरम कोऑर्डिनेटर)6) येलो हाऊस स्वराली राणे( डिसिप्लिन कोऑर्डिनेटर)7) ब्ल्यू हाऊस मंदार देवरे( हेल्थ हायजिन कोऑर्डिनेटर)8) ग्रीन हाऊस तनिष्क जाधव (सोशल कोऑर्डिनेटर )9)रेड हाऊस कुशल अहिरराव (एन्व्हायरमेंटल कॉर्डिनेटर )10)येलो हाऊस सम्यक कांकरिया (ॲथलेटिक्स कोऑर्डिनेटर )इत्यादी पदांसाठी त्यांची निवड करण्यात आली .याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .भारती पंजाबी मॅम व सौ. वैशाली लाडे मॅम व्यवस्थापक श्री .वैभव सोनवणे सर व श्री .तुषार देवरे सर, श्री कुणाल देवरे सर व हाऊस मास्टर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या दहा प्रतिनिधींचा शपथविधी कार्यक्रम पार पडला .या प्रतिनिधींनी ग्वाही दिली की त्यांना नियुक्त केलेल्या पदांचा सन्मान करून दिलेले कार्य सुरळीत पार पाडतील. तसेच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गातील क्लास मॉनिटर ची निवड देखील मतदान प्रक्रियेतून घेण्यात आली. अशाप्रकारे मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी मतदान कसे केले जाते व त्यासाठी कशी मेहनत करावी लागते याचा अनुभव घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले.