चौफेर न्यूज – दि. 23/07/2022 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंपळनेर येथे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
महान गोष्टी सहज मिळत नाहीत
आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात. हे स्फूर्तीदायक वाक्य ऐकल्यावर आपल्याला आठवण येते की म्हणजे लोकमान्य टिळकांची…
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून राहुल पाटील सर मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या. कार्यक्रमासाठी सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन काजल राजपूत यांनी केले.
लोकमान्य टिळक जयंती विषयी अधिक माहिती सरिता अहिरे यांनी दिली. लोकमान्य टिळक जयंती विषयी माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली. तसेच काही विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांचा पोशाख परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच निबंध स्पर्धा घेण्यात आली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली गेली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.