प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
राखी का त्यौहार है,
हर तरफ खुशियों की बौछार है
बंधा एक धागे में
भाई बहन का अटूट प्यार है
आजच्या या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहुल पाटील सर मुख्याध्यापिका अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता जाधव यांनी केले. रक्षाबंधनाविषयी अधिक माहिती आश्विनी सुर्यवंशी यांनी दिली.
रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक तसेच या दिवशी भाऊ बहिणीला तिचे संरक्षण करण्याचे वचन देतो. या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त प्रचिती पब्लिक स्कूल येथील सर्व विद्यार्थीनींनी राखी बांधून आपल्या भावांना आशिर्वाद दिले. व शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या बहिणीला भेटवस्तू दिल्या.
रक्षाबंधनाच्या कार्यक्रमानित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षीका पिंपळनेर पोलिस स्टेशन येथे जाऊन कार्यक्रम साजरा केला.
मा.सहाय्यक पोलिस निरीक्षक पिंपळनेर पोलीस स्टेशन श्री.सचिन साळूंखे सर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असई एल गवळी पोहेकॉ / पी. यु. सोनवणे पोहेकॉ / एम पी शिरसाठ पोना / सी. एस. सोनवणे पोना / बी. डी. सुर्यवंशी पोना / व्ही. पी. मोहते पोकॉ / एस. आर. पाटील, पोकॉ / एम. डी. पाटील, पोकॉ / एच. के. पोटोळे इत्यादी उपस्थित होते.
रक्षाबंधनाचा सण अशिक आनंदीत करण्यासाठी विद्यार्थीनी रक्षाबंधनाचे नृत्य सादर केले. अशा प्रकार प्रचिती पब्लिक स्कूल येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.