चौफेर न्यूज – रक्षणाचे सूत्र हाती बांधत प्रचितीच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाचा सुवर्ण महोत्सव साजरा- राखीचा धागा म्हणजे रक्षणाचे सूत्र ज्यांनी जनतेच्या रक्षणाचे सूत्र हाती घेतलेले आहे असे पोलीस कर्मचारी, कोर्टाचे कर्मचारी व सफाई कामगार यांना राखी बांधून प्रचिती स्कूलच्या विद्यार्थिनींनी रक्षणाचे वचन पूर्तीचा आग्रह धरत रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करत रक्षाबंधनाचे महत्त्व वाढवले. याप्रसंगी इयत्ता नववीचे विद्यार्थी नेहा पाटील व कुशल अहिरराव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत असताना रक्षाबंधन हे भावा व बहिणीच्या प्रेमाचे अतूट बंधन आहे .बहीण भावाच्या हाताला राखी बांधते म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेतो. तुटलेली नाती जोडावीत व जोडलेली नाती अधिक दृढ व्हावी हे सांगणारा हा सण आहे . रक्षाबंधन हे भाऊ व बहिणीच्या प्रेम आपुलकी ,विश्वासाचे प्रतीक आहे. याप्रसंगी साक्री तालुका पोलीस स्टेशन, कोर्ट व सफाई कामगार यांना इयत्ता दहावीतील विद्यार्थिनींनी शिक्षकांच्या मार्गदर्शना द्वारे साक्री येथील पोलीस कर्मचारी, कोर्टातील कर्मचारी, सफाई कर्मचारी यांना राखी बांधली तसेच नर्सरी ते बारावी पर्यंतच्या सर्व मुलींनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्याबांधल्या .रक्षाबंधन निमित्त इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत इको फ्रेंडली राख्या विद्यार्थ्यांनी तयार करून आणल्या व त्या राख्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. याप्रसंगी सर्व शिक्षकांनी सर्व शिक्षकांना, कर्मचारी वर्गास व वाहन चालक मंडळास राख्या बांधल्या. याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका सोनवणे मॅडम आणि भाई भाऊ बहिणी वर आधारित मेरी राखी की डोर या गाण्याचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन जागृती मॅडम व सायली मॅडम यांनी केले.