चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये 13 -8 – 2022 रोजी स्कूलच्या मुख्य प्रतिनिधी व हाऊस मास्टर्स यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले. तसेच राष्ट्रध्वजास सलामी देत ध्वजगीत सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले. 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त वर्गनिहाय भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतला व आपले विचार प्रस्तुत केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ. भारती पंजाबी मॅडम, सौ .वैशाली लाडे मॅडम, व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर, श्री.तुषार देवरे सर, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग व वाहन चालक वर्ग उपस्थित होते.