चौफेर न्यूज – 75 वा स्वतंत्रता दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त सी. बी .एस. ई बोर्डाच्या परीक्षेत दहावी मध्ये प्रथम आलेल्या पल्लवी वाघ हिच्या पालकांच्या हस्ते व आर्मीतील श्री . सागर मराठे यांच्या हस्ते ध्वजारोहण उत्साहात सुसंपन्न-: प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये 15 -8 – 2022 रोजी स्वतंत्रता दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सी.बी.एस.ई बोर्डात दहावी मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचे पालक श्री .भरत वाघ व आर्मीतील श्री मराठे यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले . याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ .भारती पंजाबी मॅडम, वैशाली लाडे मॅडम ,व्यवस्थापक श्री. वैभव सोनवणे सर ,श्री. तुषार देवरे सर, शिक्षक वर्ग ,कर्मचारी वर्ग व वाहन चालक वर्ग उपस्थित होते .ब्ल्यू, रेड ,ग्रीन, येल्लो हाऊस मधील विद्यार्थ्यांनी परेड संचालनाचे सादरीकरण केले . याप्रसंगी इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीताचे गायन केले व ध्वजास सलामी देऊन देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले .याप्रसंगी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतंत्रता दिनानिमित्त आपले विचार प्रस्तुत केले .याप्रसंगी एलकेजी ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या वेशभूषा परिधान करून त्यांची घोषवाक्य वदवली. तसेच देशभक्तीपर गीताचे सादरीकरण केले तसेच १)मेरा मुल्क मेरा देश (सहावीचे विद्यार्थी) २) ए मेरे वतन के लोगो (शिक्षक वृंद) ३) ए वतन वतन मेरे आबाद चौथी व नववीच्या विद्यार्थ्यांनी या देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले .१)बादल पे पाव है (नर्सरी ज्युनिअर सीनियर) चे विद्यार्थी२) सुनो गोरसे दुनियावालो (पाचवी) चे विद्यार्थी ३)ए मेरे वतन के लोगो (आठवी) व वंदे मातरम या गीतावर नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी नृत्याचे प्रदर्शन केले .४)जय हो या गीतावर पिरॅमिडचे सादरीकरण पाचवीच्या विद्यार्थ्यांनी केले .तसेच इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनानिमित्त ग्रीटिंग कार्ड ची स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व त्यांच्या ग्रीटिंग कार्ड चे प्रदर्शन भरविण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी, सहावी, सातवी या विद्यार्थ्यांसाठी फलक डेकोरेशन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी हेमांगी शिंदे व करिष्मा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन सुनीता पाटील मॅडम व रावसाहेब सावळे सरांनी केले कार्यक्रमासाठी सुंदर फलक लेखन व रांगोळीचे रेखाटन करण्यात आले.