चौफेर न्यूज – दि.15/08/2022 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल, पिंनळनेर येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.
यह बात हवाओ को बताए रखना
रोशनी होगी चिरगो को जलाए रखना
लहु देकर जिसकी हिफाजत हमने की
ऐसे तिरंगे को सदा दिल मे बसाए रखना
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गवळी लहु त्र्यंबक, राहुल पाटील, अनिता पाटील मॅम उपस्थित होते.
आजादीच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत तसेच ध्वजगीत गाऊन राष्ट्राप्रती घोषणा देऊन वातावरण उत्साहीत झाले.
आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी भाषण व देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले.
आजच्या कार्यक्रमासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी तिरंगा रंगातील ध्वज, ग्रीटींग कार्ड, फुले, विविध प्रकारचे चित्रे बनवली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.लहु त्र्यंबक गवळी, फोर्स नंबर् – 031464213 रँक- HC/GD असे असुन त्यांनी देशासाठी मेलवाडा, छत्तीसगड, त्रिपुरा अशा विविध ठिकाणी देशाप्रती सेवा दिली. 2018 मध्ये मेलवाडा गावात जवानांची गाडी जात असताना त्याच्या गाडीत ब््लास्ट करण्यात आला. त््यात 7 जवान शहीद झाले. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल््ह्यातील नाना पाटील त्यांचे जिवलग मित्र शहीद झाले.
तसेच त्रिपुरा येथील नक्षलवादी हल्ला झाला असता त्यांनी फायरींग करून नक्षलवादाला विरोध केला.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अर्चना देसले मॅम यांनी केले. शाळेतील शिक्षिका हेतल राजपुत यांनी भाषण केले. शाळेच्या शिक्षिका अनुष्का धामणे यांनी देशभक्तीपर गीत गायले. आभार प्रदर्शन अनुष्का धामणे मॅम यांनी केले.
तसेच कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस््थित होते.