चौफेर न्यूज – आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने रविवार दिनांक 14/08/2022 रोजी प्रचिती पब्लिक स्कूल येथे झेंडा वंदन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी आर्मी जवान श्री.राजेंद्र प्रभाकर जगताप सर, श्री.राहुल महेंद्र अहिरे सर, प्राचार्या अनिता पाटील मॅडम आणि शाळेच्या शिक्षिका उपस््थित होत्या. आर्मी जवान श्री.राजेंद्र प्रभाकर जगताप सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
आजच्या या अमृत महोत्वा निमित्ताने जगताप सरांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. श्री.राजेंद्र प्रभाकर जगताप हे रँक लेन््स नाईट युनिट 26 मराठा लाईट इनफर्निटी बेळगाव 88 चे जवान त््यांनी आपल्या देशाप्रती सेवा देताना विविध भागात ड्युटी केली. आसाम, जामनगर, दार्जिंलींग, बेंगलोर, भटिंडा, कारगिल (1999)
ते कारगिल युध्दात सहभागी असून युध्दाच्या वेळी त्यांच्या पायाला गोळी लागून ते बेशुध्द झाले होते. पण वेळीच उपचार झाले. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये कारगिलमध्ये अतिउंच दूर्गम भागी युध्द करणे खूपच अवघड असताना आपल्या भारतीय जवानांनी पाकिस्तानी घुसखोरांनी इस. 1919 च्या उन्हाह्यात अनेक ठिकाणी कब्जा केल्याचे भारतीय सैन्याने घुसखोरांना हुसकावले. या युध्दात त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. जगताप सरांनी 7.62 एम एम सेल्फ लोडिंग सायफल व एल.एम.जी.इ. हत्यारांचा वापर केला. तसेच त्यांचे सहकारी नाईक सुबेदार शंकर माने व नायब सुभेदार संजय सेंदाणे यांची त्यांना आठवण झाली. शंकर माने हे 200 फुट खोल बर्फात त्यांच्या डोळ्यादेखत कसे पडले तसेच शंकर सौंदाणे यांच्या डोक्यावर जेव्हा बर्फ पडली व त्यांच्या कवटीचे कसे तुकडे झाले. याबद्दल त्यांच्या आपल्या सहकाऱ्या विषयी सांगितले. देश सेवा करत असतांना त्यांची पत्नी यांनी ही त्यांना साथ दिली.