चौफेर न्यूज – प्रचिती पब्लिक स्कूल पिंपळनेर येथे गोकुळाष्टमी व मंगळागौरचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे श्रीकृष्ण जन्मोत्सव हा जय श्री कृष्ण व श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे च्या गजरात विद्यार्थी व शिक्षकांसमवेत मोठ्या उत्साहात साजरा केला. आजच्या कार्यक्रमावेळी प्रमुख म्हणून राहुल पाटील, अनिता पाटील मॅम उपस्थित होत्या. आजच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रिनल भामरे मॅम यांनी केले. तसेच गोकुळअष्टमी व मंगळागौर या कार्यक्रमांचे महत्व तसेच वेशिष्ट्य सर्व विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमावेळी श्रीकृष्ण भजने व भक्तीगीते विद्यार्थी तसेच शिक्षकांमार्फत गाईले गेले. आजच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण राधा, गोप, गोपिका तसेच मंगळागौर कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींनी काष्टा परिधान करून सुंदर अशा वेषभुषेत कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थी पर्व खैरनार याने श्रीकृष्णाच्या बालपणाच्या गोष्टी सांगितल्या. तसेच हार्दिक कुवर या विद्यार्थ्याने श्रीकृष्ण भजन गायले. तसेच सोनल मॅडम यांनी देखील श्रीकृष्ण भजन गाऊन कार्यक्रमात अमुल्य सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्रीकृष्णाचे तसेच सरस्वती पुजन करण्यात आले. त्यानंतर दहिहंडी उत्सव देखील साजरा करण्यात आला. यावेळी जुनिअर केजी चा विद्यार्थी कौशिक याने दहिहंडी फोडून उत्साह व्दीगुणीत केला. आजच्या कार्यक्रमात सृष्टी भदाणे, स्वरूपा बोरसे, वेदिका पाटील, रूद्राक्षी पाटील, यशस्वी पाटील या विद्यार्थिनीतर्फे श्रीकृष्णाच्या गीतांवर नृत्य सादर केले. तसेच 4थी ते 6वी च्या विद्यार्थीनींनी मंगळागौर च्या कार्यक्रमाचे नृत्य सादर केले. आजच्या कार्यक्रात सरिता खैरनार मॅडमांनी कार्यक्रमाविषयी विस्तृत माहिती दिली तसेच आभारप्रदर्शनासह कार्यक्रमाची सांगता केली.