चौफेर न्यूज – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीचा कार्यक्रम सुसंपन्न याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या सौ भारती पंजाबी मॅडम सौ वैशाली लाडे मॅडम व्यवस्थापक श्री वैभव सोनवणे सर श्री तुषार देवरे सर यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या पालखीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी पूर्वा पवार व ऋतुजा सावंत यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त माहिती देताना सांगितले की गोकुळाष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस श्रीकृष्ण म्हणजे वीर पुरुषांचा कौस्तुभ मणी, यशस्वी, मुत्सद्दी ,विजयी योद्धा, धर्म साम्राज्याचा उत्पादक ,धर्माचा महान प्रचारक, भक्तवत्सल भक्ताभिमानी ज्ञानियांची जिज्ञासूंची इच्छा पूर्ण करणारा जगद्गुरु म्हणजे श्रीकृष्ण होय भगवान श्रीकृष्णाने जीवनामध्ये अनेक असामान्य गोष्टी केल्या कंसाचा वध केला जरा ठार मारले पुतना राक्षसनीला भुईवर लोळविले कालियाच्या फणीवर नृत्य केले लाडू खाल्ले म्हणून यशोदा मातेने जेव्हा श्रीकृष्णाला आपले मुख उघडायला लावले तेव्हा तिला विश्वरूप दाखविले गोकुळ वासियांच्या आरक्षणासाठी करंगळीवर गोवर्धन पर्वत तोलून धरला अर्जुनाला कर्मयोग शिकवून कर्म प्रवृत्त केले द्रौपदीची लाज राखण्यास वस्त्र पुरविले गोपाळा संगे नाचण्याबागडण्याचा श्रीकृष्णाला भारीच हव्यास. ते नाचणे बागडणे पशु मागे धावणे ,गवळणींच्या वाटा अडवून दूध, दही मागणे ,न दिल्यास दगड मारून माठ फोडणे .वासरांना मोकळे सोडून मनसोक्त दुग्धपान करू देणे, दूध दही गोकुळांच्या बाजारात विकायला नेण्यापूर्वी गवळ्यांच्या पोरासोरांना मनसोक्त खाऊ पिऊ घालणे इत्यादी नाना परिचय क्रीडा कौतुके श्रीकृष्ण करत असत असे विशद केले .याप्रसंगी इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी अखेर दहीहंडी फोडली याप्रसंगी श्री देवेंद्र रामोळे सर व सौ रोशनी रामोले मॅडम यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा करण्यात आली .याप्रसंगी सुंदर फलक लेखन व सुंदर रांगोळीचे रेखाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन श्वेता सोनवणे मॅडम यांनी केले . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कर्मचारीवर्गाने सहकार्य केले.