प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरु असतो…
पण माणुस हा आयुष्यभर
विद्यार्थी असतो… ही माझी धारणा….
म्हणून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तिंकडून
मग तो लहान असो की मोठा,
मी काही तरी घेण्याचा,
शिकण्याचा प्रयत्न करीत असतो…
मनातल्या मनात त्यांना गुरु मानतो….
चौफेर न्यूज – आजच्या या शिक्षकदिनानिमित्त डॅा. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे समन्वयक श्रीयुत राहुल अहिरे सर उपस्थित होते. त्यांनी आपले मनोगत संबोधित असताना ‘‘शिक्षक’’ म्हणजे जे आपल्याला एक व्यक्ती म्हणून घडवतात व चांगले, वाईट याची ओळख करुन देतात. देशातील या निर्मात्यांना मी शत शत प्रणाम करतो व शिक्षकदिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देतो.
शाळेतल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांनी भाषण व कविता गायन केले तसेच त्यांनी सर्व शिक्षिका व शिक्षिकांची भूमिका साकारली व कार्यक्रमाला शोभा आणली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅम यांनी आजच्या या शिक्षकदिनी सर्व शिक्षिकांचे मनापासून अभिनंदन केले व सर्वांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेतल राजपूत मॅम यांनी केले.