साक्री : शहरात ‘पैसा झाला मोठा’ या विषयावर येथे चर्चासत्र घेण्यात आले. धुळे शहरातील कर सल्लागार श्रीराम देशपांडे यांनी उपस्थितांना बंद झालेल्या पाचशे व हजार रुपरेच्या नोटांबद्दल मार्गदर्शन केले.
चर्चासत्रात सहभागी नागरिकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. नागरिकांच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे देशपांडे यांनी देवून उपस्थित नागरिकांच्या मनातील सर्व शंकांचे निरसन केले. याचबरोबर शासनाकडून घेण्यात आलेला हा निर्णय सर्वांसाठी कसा योग्य आहे, हे त्यांनी पटवून दिले.
या निर्णयामुळे होणाऱ्या त्रासाला देशभावनेने सहन करा व देशाला सहकार्य करा, असेही आवाहन देशपांडे यांच्याकडून उपस्थितांना करण्यात आले. यावेळी साक्री येथील कर सल्लागार आर. व्ही. भदाणे, दादासाहेब रामराव पाटील को-ऑप बँकेचे संचालक भटु जैन, सीताराम गोविंदराव पाटील कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. डी.एल. तोरवणे व हस्ती बँकेचे डॉ. दिलीप चोरडिया हे व्यासपीठावर उपस्थित होते.
चर्चासत्राची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गोजरताई भामरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. चर्चासत्राचे आयोजन दि दादासाहेब रामराव पाटील को-ऑप बँकेच्या कै. गोजरताई भामरे सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी शहरातील इंदरचंद जैन, प्रभाकर चौधरी, महावीर जैन, राजेंद्र संचेती, राजेंद्र सोनवणे, नगीन पगारिरा, चंद्रकांत टाटीरा, पंकज जैन, नरेंद्र मराठे, सुरेश पटेल, हुकूमचंद जैन, सुनील पंजाबी व शहरातील व्यापारी संघटना आणि मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते; तसेच चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी पिंपळनेर, निजामपूर व दहीवेल परिसरातुन व्यापारिवर्ग आणि नगरिकही आले होते.
साक्री शहर व्यापारी संघटनेचे या चर्चासत्राला सहकार्य करण्यात आले.