धुळे : शेतकऱ्यांच्या मरणयातनांना आजपर्रंतची सर्वच सरकारे जबाबदार आहेत. दुष्काळ संपविण्यासाठी प्रयत्न केले असते, तर शेतकऱ्यांची आज दैना झाली नसती. शरद पवार रांनी शेतऱ्यांना कर्जमुक्त केले होते. त्रानंतर कोणीही शेतकऱ्यांविषयी सहानुभूती दाखविली नाही. आज काळा पैसा कचऱ्यात आणि पाण्यात फेकला जात आहे; मात्र
मात्र ज्यांच्याकडे हा काळा पैसा आहे, त्यांनी नोटा
फेकण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीला मदत करावी. शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात हा पैसा जमा करण्यात यावा. यातून काळा पैसा बाळगणाऱ्यांना पुण्य तरी मिळेल. शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याची ही संधी आहे. काळा पैसा बाळगणाऱ्यांनी त्यांच्याकडील पैशांची माती करण्यापेक्षा शेतकऱ्यांना देण्याचे मोठे मन दाखवावे. रासाठी सरकारला कोणताही नवीन कायदा करण्याची गरज नाही. यातून शेतकऱ्यांचे कर्ज फिटेल आणि सरकारच्या धोरणाला पाठबळ दिल्याचे समाधानही वाटेल. त्यामुळे सरकारने राबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय साहि
त्य
संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सबनीस बोलत होते.
मोदींची वाटचाल
नेहरूंच्या धोरणानुसार
डॉ. सबनीस यांनी या वेळी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी रांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. काळा पैसा, दहशतवाद, अवैध शस्त्रास्त्र, नकली नोटा आणि समांतर अर्थव्यवस्था यासंदर्भात मोदींनी चिंतन केले. गेल्या दोन वर्षाच्या काळात त्यांच्या सरकारने याबाबतचे प्रश्न समजून घेतले.
पंडीत नेहरूंच्या पंचशिल धोरणानुसार मोदींची वाटचाल सुरू आहे. आरएसएसच्या मुशीत वाढलेला हा माणूस विविध देशांमधे जाऊन करार करून घेतो. वेगवेगळ्या विचारांशी जुळवून घेतो. यावरून मोदींनी आाता गतिमानता स्वीकारली आहे. पाकची कोंडी करण्यात मोदी यशस्वी झाले असून, ते गौरवाला पात्र ठरले आहेत. आरएसएसची ध्येयधोरणे मला मान्य नसली, तर आरएसएसचे प्रॉडक्ट असलेले मोदी मात्र मला भावले आहेत. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेताना सहा महिने गुप्तता पाळली ती कौतुकास्पद आहे.
शरद पवारांसारखा माणूस मोदींच्या राष्ट्रभक्तीचा गवगवा करतो आहे, यातच या मोदींचे राजकीय यश सामावलेले आहे. सर्वच पक्षांना आत्मचिंतनाची गरज- काळ्या पैशासंदर्भात मोदींनी टाकलेले पाऊल स्वागतार्ह असले, तरी काँग्रेसमुक्त भारत अथवा भाजपामुक्त भारत अशी घोषणा करणे लोकशाहीला घातक आहे.
भाजपा सरकारच्या काळात भ्रष्टाचाराची उदहारणे अद्याप तरी समोर आलेली नाहीत. मात्र पक्ष कोणताही असो विचारवंताची, साहित्यकांची विभागणी होऊ नये, असेही सबनिस
या वेळी म्हणाले.