चौफेर न्यूज – राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Education) सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. राज्य सरकार समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थी हिताच्या योजना राबवल्या जातात. या समाजकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय वसतीगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
या विद्यार्थ्यांना गणवेश, रेनकोट, बूट अशा शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वितरित केलं जाणार आहे. यांसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय 9 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आलेला आहे.
याचबरोबर शासनाच्या माध्यमातून सर्व प्रकारचे अनुदान आता डीव्हीडीच्या स्वरूपात देण्यासाठीची तयारी सुरू झाली आहे, त्या पद्धतीने आता अंमलबजावणी देखील केली जात आहे.
पादत्राणे (Shoes), शालेय गणवेश (School Uniform), पी.टी.गणवेश (P.T.Uniform), रेनकोट (Raincoat)