चौफेर न्यूज –
“बालपण सुंदर असुनही, तिथे वन्समोर मिळत नाही
बालपणातुन गेल्या शिवाय, बालपण कळत नाही”.
आजच्या या कार्यक्रमास शाळेचे समन्वयक राहूल पाटिल सर, मुख्याध्यापिका अनिता पाटिल मॅम उपस्थित होत्या.
कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन करण्यात आले व रांगोळी काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी शिंदे मॅम यांनी केले. बालदिना विषयी अधिक माहिती अश्विनी सुर्यवंशी मॅम यांनी दिली.
पडित जवाहरालाल नेहरू यांचा जन्मदिवस, बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पडित जवाहरालाल नेहरूजींना लहान मुले व गुलाबाचे फुल खुप आवडायचे. बालदिनाविषयी माहिती शाळेतील विद्यार्थ्यांनी दिली तसेच कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी काही विद्यार्थीनी गीत गायन तसेच नृत्य देखील सादर केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी एक बाल नाटक सादर करून विद्यार्थ्यांचा बाल दिवस अधिकच छान केला. व विद्यार्थ्यांनी विविध खेळ साजरे केले. शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक मनोरंजना साठी एक जादूगार बोलवुन जादुचे विविध प्रोग दाखविण्यात आले.
बालदिनाविषयी अधिक माहिती समन्वयक राहूल पाटील सर व मुख्याध्यापीका अनिता पाटील मॅम यांनी दिली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने केली गेली. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.