चौफेर न्यूज –
पुणे – दि. 14 नोव्हेंबर 2022, सोमवार
श्रद्धेय पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनि. कॉलेज बालेवाडी
श्रद्धेय पब्लिक स्कूल मध्ये नेहरू जयंती उत्साहाने साजरी झाली. नेहरू जयंती निमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा राबविण्यात आली.
बालदिना निमित्त विद्यार्थ्यांच्या करमणुकीसाठी जादूचे प्रयोग तसेच बाहुल्यांचे खेळ दाखविण्यात आले. बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले व इतर विद्यार्थ्यांनी त्याचा आनंद घेतला. शिक्षीकांनी (अलका हाके, मोहिनी हुकरे, केया चॅटर्जी, धनश्री घाडगे) या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी नृत्याचे सादरीकरण केले.
याप्रसंगी शाळेच्या शिक्षकांनी पंडित नेहरू यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देताना सांगितले की नेहरूजींचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये इलाहाबाद येथे झाला. नेहरूजींची देशभक्ती बेजोड होती. त्यांनी गांधीजींबरोबर देशाच्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये सहभाग घेतला . देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेक वेळा तुरुंगात गेले .1947 मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहलाल नेहरू झाले .17 वर्षा पर्यंत देशाचे कुशल नेतृत्व त्यांनी केले. नेहरू जिना शांतीदूत म्हणून ओळखले जाते. भारताचे संशोधन, विश्व इतिहासाची झलक, वडिलांचे पत्र कन्येसाठी इत्यादी प्रसिद्ध पुस्तके त्यांनी लिहिली. मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू असे म्हणत. नेहरूजींचा जन्मदिवस हा बालदिन दिवस म्हणून साजरा करतात. गुलाबाचे फुल त्यांना अतिशय प्रिय होते. नेहरूजींनी आपल्या कार्याने भारताचा गौरव वाढवला .त्यांच्या कार्यक्षेत्रात भारताची प्रगती झाली व विश्वामध्ये भारताचे महत्त्व वाढले असे सांगितले.
तसेच रुपाली पाटील, दिव्या दिक्षित, वैशाली अवगडे, अंजली कुमारी, अमर परकाळे या शिक्षकांनी संपूर्ण कार्यक्रम राबविण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली. तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच उत्कृष्ट वेशभूषेसाठी बक्षीसे देण्यात आली.