चौफेर न्यूज – संचालक मंडळ निवडणूक (सन २०२२ ते २०२७) दि. १४/११/२०२२ थेरगाव येथील प्रेरणा को-ऑप. बँक लि.ची संचालक मंडळा करीता सर्वसाधारण मतदार संघातील दहा जागांसाठी निवडणूक संपन्न झाली. निवडणूकी करीता अकरा उमेदवार रिंगणात होते. नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे आज सोमवारी मतमोजणी झाली.
मा. तुकारामभाऊ गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन कांतीलाल गुजर यांच्या नेतृत्वाखाली तुकारामभाऊ गुजर, कांतीलाल गुजर, श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, सुरेश पारखी, संजय पठारे, संतोष मुंगसे, अॅड.अजितकुमार जाधव, नाना शिवले, सी. ए. नंदकिशोर तोष्णीवाल हे प्रेरणा सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १० उमेदवार निवडून आले. मा.तुकाराम भाऊ गुजर यांच्या विचारांचे राखीव मतदारसंघातील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अक्षय गुजर (इतर मागास प्रतिनिधी), राजेंद्र शिरसाठ (भटक्या जाती जमाती), राजाराम रंदिल (अनुसूचित जाती जमाती), सौ. सुजाता पारखी व सौ. चंद्रभागा भिसे (महिला प्रतिनिधी) यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. अरुण साकोरे यांनी काम पाहिले. मतांची आकडेवारी – १. बारणे अक्षय आनंदा (१३५) २. गुजर कांतीलाल तुकाराम (३२५२) ३. गुजर तुकाराम लक्ष्मणराव (३२६५) ४. जाधव अजितकुमार दिनकर (३२४०) ५. मुंगसे संतोष वासुदेव (३२४९) ६. पठारे संजय संतुराम (३२७३) ७. पारखी सुरेश नानाभाऊ (३२३९) ८. शिवले जगन्नाथ (नाना) कोंडीबा (३२३५) ९. तोष्णीवाल नंदकिशोर जमनालाल (३२२५) १०. वाकडकर गबाजी भिवाजी (३२३९) ११. वाल्हेकर श्रीधर धोंडीराम (३२०६) एकूण वैध मतपत्रिका संख्या :- ३३१५ एकूण अवैध मतपत्रिका संख्या : ५१