चौफेर न्यूज – केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीनं कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. यामध्ये 147 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं लेखी परीक्षा आणि मुलाखत घेल्यानंतर हा निकाल जाहीर केला आहे. उमेदवारांची मुलाखत सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाकडून घेण्यात आली होती. निवड झालेल्या उमेदवारांना चेन्नई आणि इतर ठिकाणी प्रशिक्षण दिलं जाणार आहे. एकूण 147 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे.